दोघींनी नवरा 3-3 दिवस वाटून घेतला, आठवड्यातून मिळणार 1 सुट्टी !

आय मिरर
दोन बायका अन् फजिती ऐका असं आपण म्हणतो,पण याचा प्रत्यय आता बिहार मधील एकाला आला आहे.दोन बायका असणाऱ्या एका पाटीदेवाला आता त्याच्या दोन्ही पत्नींनी 3 - 3 दिवस वाटून घेतले आहे.
बिहार च्या पूर्णिया जिल्ह्यात एक अनोखा करार करण्यात आला आहे. या करारानुसार एका नवऱ्याला त्याच्या 2 बायकांमध्ये वेळ विभागून घालवावा लागणार आहे. कौटुंबिक सल्लागार केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार, पतीला आठवड्यातून 3 दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि 3 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहावे लागेल.
उरलेला एक दिवस तो पूर्णपणे मोकळा असेल. विशेष म्हणजे, या सुट्टीच्या दिवशी तो आपल्या इच्छेनुसार कोणत्याही एका पत्नीसोबत वेळ घालवू शकतो.
दुसऱ्या लग्नाची पत्नीला कल्पनाच नव्हती
ही घटना पूर्णियाच्या रुपौली पोलीस ठाणे परिसरातील आहे. सात वर्षांपूर्वी या व्यक्तीने दुसरे लग्न केले, पण पहिल्या पत्नीला त्याची अजिबात कल्पना नव्हती. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही आहेत. मात्र, दुसऱ्या विवाहाची माहिती मिळाल्यानंतर पहिल्या पत्नीने आक्षेप घेतला आणि घरात सतत वाद होऊ लागले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, नवऱ्याने पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहण्यास सुरुवात केली. पहिल्या पत्नीचा आरोप आहे की, नवऱ्याने केवळ तिला सोडले नाही तर मुलांच्या शिक्षण आणि खर्चाची जबाबदारीही झटकून टाकली.
कौटुंबिक सल्लागार केंद्रात वाद मिटला
पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी हे प्रकरण कौटुंबिक सल्लागार केंद्राकडे सोपवले. 14 फेब्रुवारीला पती आणि दोन्ही पत्नींना हजर राहण्यास सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान पहिल्या पत्नीने नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध दर्शवला. त्यामुळे केंद्राच्या सदस्यांनी दुसऱ्या विवाहासाठी नवऱ्याला चांगलेच धारेवर धरले. तसेच, दुसऱ्या पत्नीला देखील चुकीचे ठरवले.
संपत्तीचा आणि वेळेचं विभाजन
वाद मिटवण्यासाठी केंद्राने आधी पतीला पहिल्या पत्नीसोबत 4 दिवस राहण्याचा निर्णय दिला, मात्र याला दुसऱ्या पत्नीने विरोध केला. त्यामुळे अखेर दोन्ही बायकांमध्ये समान वेळ विभागून दिला गेला. याशिवाय, पहिल्या पत्नीला दरमहा 4000 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे लागतील, असे आदेश देण्यात आले. दोन्ही बाजूंनी हा निर्णय मान्य केला आणि वाद संपुष्टात आला. या अनोख्या तडजोडीमुळे संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे आणि सोशल मीडियावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
What's Your Reaction?






