कुस्तीगीर संघ इंदापूरच्या अध्यक्ष पदी अशोक चोरमले तर उपाध्यक्षपदी सचिन बनकर यांची निवड, नव्यानेच केली संघाची स्थापना

Sep 30, 2023 - 06:45
 0  1377
कुस्तीगीर संघ इंदापूरच्या अध्यक्ष पदी अशोक चोरमले तर उपाध्यक्षपदी सचिन बनकर यांची निवड, नव्यानेच केली संघाची स्थापना

आय मिरर

नव्यानेचं इंदापूर तालुका कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या तालुकाध्यक्ष पदी पै.अशोक चोरमले तर उपाध्यक्ष पदी पै.सचिन बनकर यांची नियक्ती करण्यात आली आहे.हा संघ तालीम संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल बुचडे यांच्या संघटनेला संलग्न असून या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शरद पवार व सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याच्या माहिती नूतन अध्यक्ष पै.अशोक चोरमले यांनी दिली. 

या संघाच्या सचिव पदी योगश शिंदे,खजिनदार संतोष पिसाळ,सदस्य पदी हनुमंत पवार,अस्लम मुलानी, कुंडलिक कचरे,शशिकांत सोनार, हनुमंत रेडके,गोपाळ वाबळे,युवराज नरुटे, सद्दाम जमादार आणि पोपट शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर अशोक चोरमले म्हणाले की इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून कुस्ती क्षेत्रात अनेक मल्ल तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.या केंद्रांतर्गत अनेक विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवर चमकले आहेत. निश्चितच करण्यात आलेली निवड ही सार्थ ठरवण्यासाठी आगामी काळात देखील कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय जबाबदारी आम्ही पार पाडू.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow