बिग ब्रेकिंग | मुश्रीफ यांच्यानंतर वाशिम च्या पालकमंत्री पदाची माळ दत्तात्रय भरणेंच्या गळ्यात

आय मिरर
इंदापूरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आलीय. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात येत असल्याच परिपत्रक आज बुधवारी काढण्यात आले आहे.
यापूर्वी वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांकडे दिली होती.मात्र मुश्रीफ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे वाशिम ची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याची उत्सुकता होती.अखेर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांकडे वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक मंत्र्यांकडे विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांकडे मात्र कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती.
त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. आता मात्र वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?






