आईने पोटच्या पोरीचं मुंडकं छाटलं,भावांनी धड केलं वेगळं अन्...

Jun 6, 2025 - 19:17
 0  2463
आईने पोटच्या पोरीचं मुंडकं छाटलं,भावांनी धड केलं वेगळं अन्...

आय मिरर 

एका अल्पवयीन मुलीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या आईने मुलीचा गळा कापून हत्या केली. या क्रूर हत्याकांडात मृत मुलीच्या तीन मावसभावांनी आणि एका चुलतभावानेही आईला साथ दिली.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात ही नात्याला काळिमा फासणारी भयंकर घटना घडली आहे.

हत्या करणाऱ्यांनी प्रकरण लपवण्यासाठी मुलीचं शीर एकीकडे आणि धड दुसरीकडे फेकून दिलं. गुरुवारी सकाळी बहादुरपुर गावाजवळच्या कालव्याजवळ शीर कापलेला मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.

या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. पण मृतदेहाच्या कपड्याच्या खिशात सापडलेल्या प्रियकराच्या पत्त्याच्या चिठ्ठीमुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणं शक्य झालं. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि मृत मुलीची आई, तीन मावसभाऊ आणि एक चुलतभाऊ यांना ताब्यात घेतलं. सध्या कापलेल्या शिराचा शोध सुरू आहे.

दरम्यान, ही संपूर्ण घटना मेरठच्या दौराला पोलीस ठाणे क्षेत्रातील दादरी गावातील आहे. दादरीमध्ये राहणारे रमेश हे CRPF मध्ये कार्यरत असून, त्यांची नियुक्ती छत्तीसगढमधील बीजापुर येथे आहे. घरी रमेश यांची पत्नी राकेश, 17 वर्षीय मुलगी आस्था आणि दोन लहान मुलांसह राहत होती. आस्थाची दहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर नगला येथील बीएच्या विद्यार्थ्याशी मैत्री झाली होती. ही मैत्री पुढं व्हॉट्सअॅपवर गप्पांमध्ये बदलली आणि दोघे भेटू लागले.

28 मे रोजी राकेश आपल्या नणंदेकडे गेली होती. याचवेळी अमन आस्थाच्या घरी आला. राकेश परत आल्यानंतर तिने दोघांना एकत्र पाहिलं. आईनं आणि इतर नातेवाईकांनी आस्थाला अमनला भेटण्यास विरोध केला. पण आस्था अमनशी लग्न करण्याच्या हट्टावर अडून बसली होती.

मावस-चुलत भावांनीही दिली हत्येत साथ

बुधवारी परतापुरमधील आस्थाचे मावसभाऊ गुरदीप, मोनू आणि मनीष हे मावशी राकेश यांच्या घरी आले. यांच्यासोबत दिल्लीतील आस्थाचा चुलतभाऊ विपिनही उपस्थित होता. आरोप आहे की, यानंतर आई राकेशने या सर्वांसोबत मिळून धारदार हत्याराने आस्थाचा गळा कापून तिची हत्या केली आणि शीर धडापासून वेगळे केलं. हत्येनंतर मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले. धड 13 किलोमीटर दूर बहादुरपुरजवळ कालव्यात फेकलं. तर शीर 10 किलोमीटर दूर फेकलं.

आईने पोलिसांसमोर कबूल केला गुन्हा, एक आरोपी फरार

मृत मुलीच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर, आईने सुरुवातीला मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. पण कडक तपास केल्यानंतर आईने मुलीच्या हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आई आणि तीन भावांना ताब्यात घेतलं. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी मृतदेह ठिकाणी लावण्यासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. मृत आस्थाचे वडील रमेश सीआरपीएफमध्ये कार्यरत असून, त्यांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow