पाच हजारांची लाच मागणं राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाला पडलं महागात, 3 हजारांची लाच स्वीकारताना सापडला एसीबीच्या जाळ्यात

Feb 6, 2025 - 13:07
Feb 6, 2025 - 13:10
 0  274
पाच हजारांची लाच मागणं राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाला पडलं महागात, 3 हजारांची लाच स्वीकारताना सापडला एसीबीच्या जाळ्यात

आय मिरर

दाखल गुन्ह्यामध्ये मदत करणेकरिता व पुन्हा दारू विक्रीचा धंदा चालू करून देणेकरिता सहा हजार रुपये लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची तडजोड केल्यानंतर यातील पहिला हप्ता तीन हजार रुपये स्वीकारताना कराड येथील राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

भीमराव शंकर माळी वय 37 वर्ष निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड व खासगी व्यक्ती मुस्तफा मोहिदिन मणियार वय 25 वर्ष दोघेही राहणार मलकापूर ता. कराड अटक केलेल्यांची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचेवर नोव्हेंबर 2024 मध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड या कार्यालयाकडून अवैध दारू विक्री केल्याबाबत कारवाई करण्यात आली होती. यातील भीमराव माळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क याने दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता व पुन्हा दारू विक्रीचा धंदा चालू करून देणेकरिता स्वतः करिता प्रथम सहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल करून यातील पहिला हप्ता तीन हजार रुपये मनियार या खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र व राजेश वाघमारे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन राऊत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, सुदर्शन पाटील, विठ्ठल रजपूत यांनी ही कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow