इंदापूरमध्ये भीषण अपघात,कंटेनरच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

आय मिरर
पुण्याच्या इंदापुरातील लांजेवाडी गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. बारामती राशीन रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मालवाहू कंटेनर आणि दुचाकी मध्ये हा अपघात झाला असून यात दुचाकी वरील तरुण ठार झाला आहे.अक्षय बबन आव्हाड असं 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावच्या हद्दीत कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला गेला. यावेळी भिगवण बाजूकडून बारामतीच्या दिशेने निघालेला अक्षय बबन आव्हाड या दुचाकी स्वराला कंटेनर ची ठोस बसली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
अक्षय हा मूळचा शेवगाव तालुक्यातील खानापूर गावचा असून, सध्या तो बारामतीत वास्तव्यास होता.
दरम्यान योगेश सिद्धेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक इराणा यशवंत अलगी विजापूर,कर्नाटक याच्याविरुद्ध भिगवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवन चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हंडाळ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
What's Your Reaction?






