इंदापुरात आजपासून शरद कृषी महोत्सव; रोहित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन

Feb 13, 2025 - 08:26
 0  743
इंदापुरात आजपासून शरद कृषी महोत्सव; रोहित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे गुरुवारपासून (ता. १३) शरद कृषी महोत्सवास प्रारंभ होत आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या पाच दिवसीय प्रदर्शनात कृषी प्रदर्शनासह शेतकऱ्यांसाठी शेतीतील 'ए आय' या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत चचार्सत्र यासह विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.

इंदापूर येथील प्रशासकीय भवन शेजारी असलेल्या भव्य प्रांगणात आयोजित या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठीची माहिती उपलब्ध होणार आहे.

 महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी शनिवारी कृषी तंत्रज्ञानावर आधारित चर्चासत्रास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आयोजन केले आहे.

रविवारी खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत महिला व मुलींसाठी खेळ पैठणीचा, शरदचंद्रजी पवार मंच आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ व सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शन समारोप समारंभहोणार आहे.

महोत्सव यशस्वितेसाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, छाया पडसळकर, किसनराव जावळे, सागर मिसाळ, अॅड. इनायत काझी, रेशमा शेख, अमोल मुळे, संजय शिंदे, समद सय्यद, देविदास भोंग, गणेश देवकर, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, दत्ता बाबार, मयूर शिंदे, गणेश देवकर प्रयत्न करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow