इंदापूरातील तावशीत पार पडली भाजपा किसान मोर्चा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Nov 27, 2023 - 17:30
 0  1121
इंदापूरातील तावशीत पार पडली भाजपा किसान मोर्चा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आय मिरर

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित तावशी ता. इंदापूर येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व मान्यवर उपस्थित होते.     

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या व पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे व त्यामधून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावेत त्यांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून किसान मोर्चा च्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी कबड्डी सामने बघण्याचा आनंद घेतला तसेच यावेळी त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.      

या स्पर्धेला जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31 हजार रुपये व चषक विजेते राणा प्रताप कळंब , द्वितीय बक्षीस रोख रक्कम 21 हजार रुपये व चषक भालचंद्र निंबाळकर संघ भवानीनगर व तृतीय बक्षीस ११ हजार रुपये व चषक जयंत स्पोर्ट्स इस्लामपूर यांनी पटकावले.      

या स्पर्धेचे आयोजन किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष तानाजीबापू थोरात,सचिन मचाले, लालासाहेब सपकळ, माऊली शेळके, सचिन भाग्यवंत व भैरवनाथ तरुण मंडळ तावशी यांनी आयोजित केले होते.     

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व आयोजकांचे अभिनंदन केले. वासुदेव काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अत्यंत कमी कालावधीमध्ये स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गणेश भेगडे यांनी तानाजीबापू थोरात व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.      

यावेळी जिल्ह्यामधून बाबाराजे जाधवराव, दादासाहेब सातव, जयेश शिंदे,अविनाश मोटे, विलास माने, करण घोलप, गोविंद देवकाते, सुजित वायसे ,सतीश फाळके, शहाजी शिंदे, शहाजी कदम, भालचंद्र निंबाळकर सर, चंद्रकांत सपकळ, रवींद्र यादव, संदीप मुलमुले, पैलवान अमरसिंह जगदाळे, हरिभाऊ ठोंबरे, संग्रामसिंह निंबाळकर, श्याम कोकरे, बाबामहाराज खारतोडे, संतोष चव्हाण, पि. के. जगताप, प्रताप रायते व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow