परभणी घटनेवरून मंत्री रामदास आठवले यांचा राज्य सरकारला घरचा आहेर, वाचा काय म्हणाले आठवले...

Feb 25, 2025 - 08:12
 0  237
परभणी घटनेवरून मंत्री रामदास आठवले यांचा राज्य सरकारला घरचा आहेर, वाचा काय म्हणाले आठवले...

आय मिरर

राज्यामध्ये बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू या घटना ताज्या असतानाच पुण्यातील भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांची आंतरजातीय विवाहामुळे झालेली हत्या यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेतलेले असतानाच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील झालेल्या मृत्यूवरून रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

परभणी मधील घटनेत अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही. राज्यात आमचे सरकार आहे,या सरकारला सत्तेत आणण्यात दलित मतदारांचा फार मोठा वाटा आहे.अस असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यात आम्हाला न्याय मिळत नाही हे चित्र स्पष्ट दिसतय.

एस आय टी नेमली आहे, पण त्यात मामुली अधिकारी आहेत. त्यात सक्षम आयपीएस दर्जाचा अधिकारी असायला हवा. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी.ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा शब्दात रामदास आठवले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. 

सोमवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मंत्री रामदास आठवले यांनी पुण्याच्या इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आठवले बोलत होते.

यावेळी विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अमोल मिसाळ, हनुमंत कांबळे, अरविंद वाघ, कैलास कदम, किरण गानबोटे, लखन जगताप, रमेश शिंदे यांनी आठवले यांचा सत्कार केला.

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण या सोबतच परभणी येथील सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू आणि यानंतर पुण्यातील भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांची आंतरजातीय विवाहामुळे झालेली हत्या या घटनांवरून राज्यात विरोधक आक्रमक झाले राज्य सरकारला पुरून घेण्याचा प्रयत्न करून दाखल करून केला जात असताना राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोणत्या कारणामुळे मारहाण झाली त्याची कल्पना मला नाही...

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी वर बोलताना मंत्री आठवले म्हणाले की,मुरलीधर मोहोळकर माझे चांगले मित्र आहेत. ते शांत स्वभावाचे आहेत.कोणत्या कारणामुळे मारहाण झाली त्याची कल्पना मला नाही.विनाकारण मारहाण झाली असेल तर ते योग्य नाही.राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत.तरी देखील काही घटना होत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत असतो. 

विक्रम गायकवाड हत्या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता....

पुणे जिल्ह्यात विक्रम गायकवाड याने मराठा समाजातील मुलीबरोबर विवाह केला, तो शिकलेला आहे त्याची घरची परिस्थिती चांगली आहे. पण ज्याने त्याच्यावर हल्ला केला तो त्याचा मित्रच होता. विक्रम गायकवाड याचा मृत्यू झाला आहे.त्याच्या वडिलांची मी विचारपूस केली आहे. दोषी आरोपीला पकडले आहे. यात अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड सह सर्व आरोपी पकडले आहेत.परभणी मधील घटनेत अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही.राज्यात आमचे सरकार आहे,या सरकारला सत्तेत आणण्यात दलित मतदारांचा फार मोठा वाटा आहे.अस असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यात आम्हाला न्याय मिळत नाही हे चित्र स्पष्ट दिसतय.एस आय टी नेमली आहे, पण त्यात मामुली अधिकारी आहेत. त्यात सक्षम आयपीएस लेव्हलचा अधिकारी असायला हवा. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी.ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow