Dound मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना, खुद्द नवराच बायकोला त्याच्या मित्रांसोबत जबरदस्तीने संबंध ठेवायला लावायचा

आय मिरर
दौंड तालुक्यातून मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. भरतगाव येथील एका विवाहित महिलेला तिच्या पतीने स्वतःच्या तीन मित्रांसोबत जबर दस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून यवत पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
सदरची ही महिला २०२३ पासून एप्रिल २०२५ पर्यंत सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करत होती.
तिच्या इच्छेविरुद्ध शेतात आणि घरी तिच्या पतीने त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला.पीडितेने अखेर यवत पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
याप्रकरणी यवत पोलिसांनी आता संबंधित महिलेचा पती आणि त्याचे तीन मित्र यांना वेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता येवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण देशमुख करत आहेत.
What's Your Reaction?






