माऊलींच्या पादुकांना आज घातलं जाणार निरास्नान...

Jun 26, 2025 - 10:20
 0  121
माऊलींच्या पादुकांना आज घातलं  जाणार निरास्नान...

आय मिरर 

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज वाल्मीकीची नगरी असलेल्या वाल्हे नगरीतीचा निरोप घेत नीरा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे. हा पालखी सोहळा साधारण साडेदहाच्या सुमारास नीरा नगरीत दाखल होईल. दुपारी 1 वाजेपर्यंत नीरा नगरीत नीरा नदीच्या काठावर विसावा घेतल्यानंतर हा माऊलींचा सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह नीरा स्नानासाठी मार्गस्थ होईल.

नीरा नदी काठावर असलेल्या दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना पवित्र स्नान घातले जाईल. या नंतर हा पालखी सोहळा ज्यांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली त्या हैबत बाबांच्या जन्म भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात मार्गक्रमण करेल.

सातारा प्रशासन या सोहळ्याचं नीरा नदी काठावर स्वागत करत तर पुणे जिल्हा प्रशासन त्यांना निरोप देईल. त्यानंतर हा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावेल.लोणंद येते या पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असेल.

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचा भाग म्हणून, नीरा नदीच्या काठी, दत्त घाटावर हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात वारकरी मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात आणि 'ग्यानबा-तुकाराम' असा जयघोष करतात.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कालचा मुक्काम हा पुणे जिल्ह्यातील महर्षी वाल्मिकींच्या पुण्यभूमीत म्हणजे वाल्हे नगरीत होता.

वाल्हे करांचा निरोप घेऊन हा सोहळा नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाला आहे.दुपारी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये निरास्नान घातलं जाणार आहे.आज सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा हा सोहळा निरा नदीच्या काठावर दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow