शहा सांस्कृतिक भवनात पार पडली राज्यस्तरीय कुराश चॅम्पियनशीप

Sep 20, 2023 - 18:59
 0  438
शहा सांस्कृतिक भवनात पार पडली राज्यस्तरीय कुराश चॅम्पियनशीप

आय मिरर

ग्रामीण भागातील क्रीडापटूना प्रोत्साहन मिळण्यासाठी क्रीडास्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्जुनवीर पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार यांनी केले.सिनियर राज्यस्तरीय कुराश चॅम्पियनशीपचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शहरातील शहा सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा पार पडली. 

ऑलिंपिक असोसिएशनचे निरीक्षक अमित गायकवाड,राजाभाऊ घुले,महाराष्ट्र कुराश संघटनेचे अध्यक्ष रणजित जगताप,सचिव शिवाजीराव साळुंखे, सोलापूर अमोल शिंदे,पुणे जिल्ह्याच्या सचिव तेजश्री व्यवहारे, नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, उद्योजक अंगद शहा पैलवान पिंटू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न झाली.    

या स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून महाराष्ट्र कुराश टेक्निकल डायरेक्टर दत्तात्रय व्यवहारे,श्रुती पुनगावकर,अमर खराडे,अमित भोसले,अजय बलगानूरे,सुनील जाधव,जयश्री व्यवहारे रुपेश भालेराव यांनी काम पाहिले.   

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमधील १२८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या पैकी दहा मुल दहा मुलींची दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow