BARAMATI यादवांनी कंबर कसली अन् एकाच पंधरवड्यात 9 लाख 75 हजार दंड वसूल झाला ! कोणालाच सुट्टी दिली नाय

आय मिरर
बारामती शहरात पोलिसांच्या वाहतूक शाखेने काळ्या काचांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून अवघ्या 15 दिवसांत स्कॉर्पिओ, थार,फॉर्च्यूनर,वेर्ना,स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत तब्बल 152 चारचाकी वाहनांवर पोलिसांनी थेट कारवाई करत आत्तापर्यंत 9 लाख 75 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईतून वाहतूक पोलिसांनी वाहनांचा गुन्हेगारी हेतूने वापर करणाऱ्या प्रवृत्तींना चांगलाच चाप लावला आहे तर या मोहिमे दरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील पोलिसांना शोध लागला आहे.
पुण्याच्या बारामतीत पोलिसांच्या वाहतूक शाखेने 'काळ्या काचा' विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ही मोहीम आता अधिक आक्रमक झाली असून,अवघ्या 15 दिवसांत स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत तब्बल 152 चारचाकी वाहनांवर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. या दंडात्मक कारवाईतून आत्तापर्यंत 9 लाख 75 हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
यापूर्वी वारंवार दंड केल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यामुळे, वाहतूक विभागाने मोहीमच सुरू करून थेट कारवाईचा धडाका सुरु केला. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात असून, शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी सुरू आहे.
विशेषतः कोर्ट, कॉर्नर चौक, कसबा चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. वाहनांवरील नंबर प्लेट लपवणे, नंबर अतिशय लहान लिहिणे अशा पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कडक कारवाई होत आहे.
काळ्या काचा लावलेल्या वाहनांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. अनेक वेळा अशा वाहनांचा वापर गुन्ह्यांमध्ये होतो. त्यामुळेच ही मोहीम गरजेची होती. गाडीच्या काचा 'काळ्या असतील किंवा कुठे शंका वाटल्यास तात्काळ 9923630652 या क्रमांकावर माहिती संपर्क साधावा,' असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, वाहतूक पोलीस जवान सुधाकर जाधव, प्रदीप काळे,प्रशांत चव्हाण,सीमा घुले,स्वाती काजळे,सीमा साबळे,अजिंक्य कदम,माया निगडे,रूपाली जमदाडे,रेश्मा काळे,प्रज्योत चव्हाण,योगेश कातवारे,अमोल मदने,योगेश कुंभार तसेच शीघ्र कृती दलाचे जवान १० यांनी केली आहे.
What's Your Reaction?






