तुम्हाला हे माहितीय का? आता व्हॉट्सॲप स्टेटसवर 30 सेकंद नाही तर "इतक्या" मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करता येणार

Mar 20, 2024 - 07:05
 0  629
तुम्हाला हे माहितीय का? आता व्हॉट्सॲप स्टेटसवर 30 सेकंद नाही तर "इतक्या" मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करता येणार

आय मिरर

व्हॉट्सॲप एकामागून एक नवीन फीचर्सवर काम करत आहे. अलीकडेच WhatsApp ने अलीकडे अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. अशातच कंपनीने आता स्टेटस अपडेटसाठी आत्तापर्यंतचे सर्वात दमदार फीचर आणले आहे. या नवीन फीचरमध्ये युजर्स स्टेटस अपडेटमध्ये एक मिनिटाचा व्हिडिओही शेअर करू शकणार आहेत.

आतापर्यंत व्हॉट्सॲपवर स्टेटस फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला जाऊ शकत होता, मात्र हे नवीन फीचर आणल्यानंतर स्टेटसची वेळ मर्यादा वाढवण्यात आली आहे. WABetaInfo ने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. एवढेच नाही तर WABetaInfo ने नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

कंपनी हे नवीन फीचर बीटा यूजर्ससाठी आणत आहे. बीटा वापरकर्ते Android 2.24.7.6 साठी WhatsApp बीटामध्ये हे अपडेट पाहू शकतात. यूजर्स बऱ्याच दिवसांपासून स्टेटसमध्ये मोठे व्हिडिओ शेअर करण्याच्या फीचरची मागणी करत होते, त्यानंतर त्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतरच हे वैशिष्ट्य जागतिक वापरकर्त्यांसाठी आणले जाणार आहे.

स्टेटस अपडेट फीचरशिवाय व्हॉट्सॲप आणखी एका फीचरवरही काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही व्हॉट्सॲपवर UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करू शकाल. WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की कंपनी या फीचरची बीटा चाचणी करत आहे, त्यानंतरच हे फीचर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow