मराठा तरूणांना दिलासा, पाटील आणखी एक लढाई जिंकले, पण…
आय मिरर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवर टीका केली. इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास नाहीय, नेता नाही, अंजेडाही नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी ईव्हीएमवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षांनाही त्यांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विचारण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा तरुणांना फायदा होईल असं सांगताना या आंदोलनावेळी दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घेतले जातील असंही म्हटलं.
मराठा आरक्षण आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले की, अदखलपात्र गुन्हे ज्यामध्ये कोणतीही मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांकडून मालमत्ता आणि जीवीत हानी झालेली नाही असे गुन्हे आम्ही मागे घेण्याचा निर्णय आम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वीच घेतला आहे. याची प्रक्रिया प्रशासकिय पातळीवर सुरू झालेली आहे.
जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा अद्याप सुरू आहे. राज्यव्यापी दौराही त्यांनी केला. तेव्हा मराठा आरक्षणासाठी त्यांनी काही ठिकाणी सभा घेतला. त्यातच बीड जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले आहेत. आता यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.
जरांगे पाटलांचा इशारा
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २४ तारखेला बैठक होणार असल्याचं सांगितलं आहे. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. जी प्रचंड मोठी बैठक असणार आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असेल असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
What's Your Reaction?