जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घ्यायचंय तर घालावे लागतील हे कपडे;आजपासून ही नियमावली लागू

आय मिरर
महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर तुम्ही दर्शनाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.कारण आता पाश्चात्य संस्कृतीचे अंग प्रदर्शन करणारे अपुरे कपडे घालून जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन तुम्हाला घेता येणार नाही.कारण श्री मार्तंड देव संस्थानने कपड्यांबाबत वस्त्र संहिता लागू केली आहे. वस्त्र संहिता लागू करणारं जेजुरी देवस्थान हे एकमेव नाही तर राज्यात आणि देशात यापूर्वी देखील अनेक मंदिरात अशा पद्धतीची वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे.
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला अंग प्रदर्शन करणारे जसं की फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट स्कर्ट असे व तत्सम कपडे घालून श्री खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही.तुम्हाला खंडेरायाच्या दर्शन करायचं असेल तर भारतीय वेशभूषेतच जावं लागेल.श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करणारं जेजुरी देवस्थान हे केवळ एकमेव देवस्थान नाही. तर यापूर्वी देखील राज्यातील अनेक मंदिरांमध्ये अशा पद्धतीची वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. राज्यात कोणकोणत्या मंदिरात अशा पद्धतीची वस्त्र संहिता लागू केली आहे.
नागपूर येथील श्री गोपाल कृष्ण मंदिर यासह इतर चार मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला.तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साई मंदिर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर, अकोल्यातील राजेश्वर मंदिरातही वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे.तर सोलापूर मधील 17 मंदिरांमध्ये देखील अशा पद्धतीची वस्त्र संहिता यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.कर्नाटकातील तिरुपती बालाजी मंदिरात देखील बर्म्युडा, हाफ पँट किंवा टी-शर्ट घालून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. परंतु शर्ट आणि पँट घातलेल्या पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातो.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये या आधीच वस्त्र संहिता आहे. त्यानंतर आता अखंड महाराष्ट्राचा कुलदयात असणाऱ्या जेजुरी देवस्थान येथे असा निर्णय घेतला आहे.
काय आहे निर्णय ?
पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत.महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत.दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.
एकूणच अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला आता भारतीय वेशभूषा परिधान करणं बंधनकारक करण्यात आलय. जर तुम्ही भारतीय वेशभूषेतील पारंपारिक कपडे परिधान करून जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलात तरच तुम्हाला खंडेरायाचे दर्शन मिळू शकते. श्री मार्तंड देव संस्थान च्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्हाला फॅशन म्हणून वापरल्या जाणाऱ्या फाटक्या जीन्स बर्मुडा शॉर्ट स्कर्ट अशा पद्धतीची पाश्चात्त्य संस्कृतीची कपडे घालून श्री खंडरायाचे दर्शन करता येणार नाही.आतापासूनच हा नियम देखील लागू करण्यात आलाय.जर पाश्चात्य संस्कृतीची वस्त्र परिधान करून तुम्ही जेजुरी गडावर गेला तर तुम्हाला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
What's Your Reaction?






