हवी होती 'ही' गोष्ट.. सांगलीतील पतीच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Jun 14, 2025 - 17:21
 0  1385
हवी होती 'ही' गोष्ट.. सांगलीतील पतीच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

आय मिरर 

सांगलीतील एका तरुणीने पैशासाठी तिच्याहून दुप्पट वयाच्या पुरूषाशी लग्न केलं होतं. महिलेने ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं त्या व्यक्तीला आधीच दोन मुली होत्या, ज्यांचे लग्नही झाले होते.

असं असतानाही महिलेने या व्यक्तीशी लग्न केलं. पण लग्नाच्या तीन आठवड्यांनंतर तेही वटपौर्णिमेच्या दिवशीची तिने आपल्या पतीची कुऱ्हाडीने हत्या केली. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिलेला तिच्या वृद्ध पतीशी शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते. म्हणूनच तिने त्याची हत्या केली.

एकटेपणा दूर करण्यासाठी केलेलं तरुणीशी लग्न

ही घटना सांगलीच्या एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. सांगली पोलिसांनी बुधवारी 27 वर्षीय राधिका इंगळे हिला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक केली.

लग्नाच्या सुमारे तीन आठवड्यांनंतर राधिकाने तिचा 54 वर्षीय पती अनिल लोखंडे हिची कुऱ्हाडीने हत्या केली.

सांगली पोलिसांनी सांगितले की, लोखंडे यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झालेला. त्याला दोन मुली होत्या ज्यांची लग्न झाली होती. अनिलला घरी एकटेपणा जाणवत होता, म्हणून त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, राधिका इंगळे देखील तिच्या आईसोबत एकटी राहत होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिला काही आधाराची गरज होती. कुटुंबाच्या संमतीने दोघांनीही 17 मे रोजी लग्न केलं होतं.

शारीरिक संबंध ठेवण्यास द्यायची नकार

कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राधिका इंगळे हिने सांगितले की, वैद्यकीय स्थितीमुळे ती मुलाला जन्म देऊ शकत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही कचरत होती. लग्नानंतर अनिल लोखंडेने राधिकासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने सबब सांगून त्याला नकार दिला. त्यानंतरही ती अनेक दिवस नवीन सबबी राहिली, ज्यामुळे अनिल तिच्यावर बराच रागावला होता.

हत्येचा गुन्हा दाखल

दरम्यान, काही दिवसानंतर तिला भीती होती की, ती आता शारीरिक संबंध टाळू शकणार नाही, म्हणून तिने मंगळवारी रात्री तिच्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. आता या प्रकरणी पोलिसांनी राधिकाला आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केलं. ज्यानंतर कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow