आज इंदापूरात पार पडणार 'दांडीया नाईटस् आणि रॅम्प शो' युवा नेते पोपट शिंदेंकडून महिलांसाठी खास आयोजन 

Oct 17, 2023 - 22:08
Oct 19, 2023 - 08:48
 0  1274
आज इंदापूरात पार पडणार 'दांडीया नाईटस् आणि रॅम्प शो' युवा नेते पोपट शिंदेंकडून महिलांसाठी खास आयोजन 

आय मिरर

इंदापूर करांना यंदाच्या नवरात्री महोत्सवात "नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२३"या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेता येणार असून आज गुरुवारी दि.१९ आँक्टोंबर रोजी माजी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे यांच्या माध्यमातून दांडीया नाईटस् म्हणजे गरबा नाईटस् रॅम्प शो चे आयोजन करण्यात आले आहे.

इंदापूरात प्रथमचं सलग चौथ्या वर्षी नवरात्री मोहत्सव फेस्टीवल सिजन - 4 पार पडणार असून यात महिलांसाठी दि.१८,१९ आणि २० आँक्टोंबर रोजी खास कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर आणि सोएब भाई बागवान यांनी दिली.

इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे,कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या संचालिका सारिका दत्तात्रय भरणे,इंदापूरच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,ग्रामपंचायत कोरेगांवच्या सरपंच निर्मला नवले,लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले आदी मान्यवरांसह विविध कलाकार या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.दि.१९ रोजी टेंभुर्णी नाका, सावतामाळी मंदिर परिसरात प्रभाग -७ मध्ये सायंकाळी ०७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमात महिलांना आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने असून महिलांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.तर गांधी सराफ (बारामतीकर ) श्री. नरेंद्र गांधी व श्री. तन्मय गांधी यांच्या वतीने लकी ड्रॉ ३ भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ दिली जाणार आहे.तर दांडीया मध्ये बेस्ट परफॉर्मन्स प्रथम विजेत्यास शेरु रिसॉर्ट टूर पास डाॅ.अनुजा दोशी आणि डाॅ.सागर दोशी यांकडून दिला जाणार,तर व्दितीय क्रमांक बेस्ट एनर्जी साठी डाॅ.प्रतिभा वनवे आणि डाॅ.अतुल वनवे यांडून एल.ई.डी.टि.व्ही. दिला जाणार आहे. आणि तृतिय क्रमांक बेस्ट कॉस्ट्यूम साठी डाॅ.भारती कुरुडकर आणि डाॅ.उदय कुरुडकर यांकडून होम थिएटर बक्षिस दिले जाणार आहे.तर रॅम्प शो बक्षीसे करीत प्रथम,व्दितीय आणि तृतिय क्रमांकास डॉ. सुषमा सपकळ व श्री. लक्ष्मण सपकळ यांकडून अनुक्रमे स्मार्ट वॉच,एरर वडस् आणि ब्लुटुथ हेडफोन बक्षिस स्वरुपात दिले जाणार आहे.या स्पर्धात सहभाग घेण्यासाठी अर्चणा काळपांडे - ९२८४९०३९४५ । माधवी सुन्नीस ९९२३३९०५५८ स्वाती नागपुरे - ८००७००६७६७ । अनिता खरात - ७७४१८६५६०७ यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रमेश शिंदे, शोएब भैय्या बागवान, राहुल शेठ गुंडेकर यांच्यासह आदित्य बोराटे, महेश ढगे, अजित राऊत, गौरव राऊत, रहिम बागवान, सागर राऊत, अमोल राऊत, सचिन शिंदे, सौरभ शिंदे, सोहल बेपारी, प्रतिक झोळ, अजिंक्य बंगाळे,राजन पवार, प्रसाद चेंदके,शक्ती पलंगे, नेहा कोल्ड्रींक्स ॲण्ड आईस्क्रीम, इंदापूर, गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर महात्मा फुले ग्रुप, इंदापूर, महात्मा फुले दहिहंडी संघ, इंदापूर, नगरसेवक पोपट शिंदे मित्र परिवार इंदापूर इंदापूर नगरपरिषद, इंदापूर, पोलिस स्टेशन, इंदापूर, पत्रकार बंधू इंदापूर, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर, घुले मंडप अँण्ड डेकोरेटर्स, नातेपुते, सुत्र संचालक संतोष नरुटे यांच्या विशेष सहकार्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow