Shirish Valsangkar : सोलापूर हादरलं ! लाखो रुग्णांच्या मेंदूची नस ओळखणाऱ्या डॉ. शिरीष वळसंगकरांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

आय मिरर
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काल शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आत्महत्या केली.शिरीष वळसंगकरांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं.
गोळीबारात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेनं सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली, याबाबत आता पोलीस तपास सुरु आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली. दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुलाने स्वत: रुग्णालयात केले उपचार...
शिरीष वळसंगकर हे रात्री 8 वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करीत होते. 8.30 वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची अशी आहे कारकीर्द
- अनिवार्य रोटरी इंटर्नशिप इंटर्न, सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर (01/07/1978 ते 31/12/1978)
- इंटर्न, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी (01/01/1979 ते 30/06/1979)
- जनरल हॉस्पिटल, सोलापूर येथे तीन वर्षांचे पदव्युत्तर प्रशिक्षण (डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज-सोलापूर) अंतिम एमडी
- निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार (न्यूरोलॉजी विभाग) बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त (07/05/1983 ते 22/12/1983)
- लोकम कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट - बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (08/05/1983 ते 23/05/1983 आणि 10/11/1983 ते 20/11/1983)
- एसपी इन्स्टिटयूट ऑफ न्युरोसायन्सेस, सोलापूरचे ते प्रमुख होते.
What's Your Reaction?






