जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीक अप टेम्पोचा भीषण अपघात,एका महीलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू ! इंदापुरातील एकाचा समावेश

आय मिरर
जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकप टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनी समोर रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला झाला आहे. किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेल मध्ये पीकअप टेम्पो मधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते.
यावेळी जेजुरी कडून इंदापूर कडे जाणाऱ्या कार ने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली.या अपघातात टेम्पो तून साहित्य खाली उतरविनारे,हॉटेल मधील व कार मधील असे आठ जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
तर दोन मुले,एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले झाल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी जेजुरी पोलीस दाखल झालेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये सोमनाथ रामचंद्र वायसे,रामू संजीवन यादव हे दोघेही पुरंदर तालुक्यातील नाझरे कप या ठिकाणचे आहेत.तर अजय कुमार चव्हाण हा उत्तर प्रदेशातील आहे.
अजित अशोक जाधव हा भोर तालुक्यातील कांजळे येथील असून किरण भारत राऊत हा इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील आहे. यासोबतच आश्विनी संतोष ऐसार नागणसूर हेंद्रे सोलापूर या ठिकाणची आहे.तर अक्षय शंकर राऊत हा बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील असून अन्य एकाची ओळख पटलेली नाही.
What's Your Reaction?






