लाखेवाडीत जय भवानी विकास गड प्रतिष्ठानकडून ४ व ५ फेब्रुवारी रोजी मल्हार महोत्सवाचे आयोजन

Feb 2, 2024 - 18:19
 0  382
लाखेवाडीत जय भवानी विकास गड प्रतिष्ठानकडून ४ व ५ फेब्रुवारी रोजी मल्हार महोत्सवाचे आयोजन

आय मिरर(देवा राखुंडे)

लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल येथे दि.४ व ५ फेब्रुवारी रोजी मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व सचिव हर्षवर्धन खाडे यांनी दिली.

महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक डॉ. सुहास चौरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व मुंबई येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर विक्रांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्री प्रायमरी ते इयत्ता सातवी पर्यंतचे विद्यार्थी विविध बोली भाषेतील गाण्यांवर नृत्यांचे सादरीकरण करणार आहेत.

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, भारत सरकार रक्षा मंत्रालयाचे सहसंचालक अभिजीत सानप, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याहस्ते होणार आहे.

याप्रसंगी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या थीम सादरीकरणासह, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, फ्युजन सॉंग, कोळीगीते, लोकगीते व देशभक्तीपर गीतांसह विविध कला अविष्कार महाविद्यालयातील तरुण-तरुणी सादर करणार आहेत.

यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्काराने रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या कलेची छाप उमटविणारे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक, निर्माते मंगेश देसाई व वेदमूर्ती,वास्तुतज्ञ, ज्योतिषाचार्य सुजित देशमुख गुरुजी यांना गौरविण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow