उद्या ठरणार माळेगाव चा कारभारी ! अजित पवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

Jun 23, 2025 - 21:08
Jun 23, 2025 - 21:09
 0  104
उद्या ठरणार माळेगाव चा कारभारी ! अजित पवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

आय मिरर 

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी काल 22 जून रोजी मतदान पार पडलं त्यानंतर आता उद्या 24 जून रोजी प्रत्यक्षात मतमोजणी होणार असून माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बारामतीच्या राजकारणातील महत्त्वाची संस्था आहे. तब्बल 37 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 19000 हून अधिक शेतकरी सभासद आहेत. मागील पाच वर्षाच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ काम करत होत.

आता मात्र स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी तावरे गटाने सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना कडवं आव्हान दिले आहे.

आतापर्यंत बारामतीतून अजित पवारांचा किल्ला अभेद्य राहिलाय, तरी देखील अजित पवारांना माळेगाव जिंकण्यासाठी बारामतीत ठाण मांडावं लागलं. एक दोन हवे तर तब्बल बारा जाहीर सभा अजित पवारांना घ्याव्या लागल्या आणि त्याच कारण आहे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांसमोर उभा केलेलं कडवं आव्हान.

सुरुवातीला अजित पवार शरद पवार गटाला काही जागा देतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ही निवडणूक लढवतील असं चित्र होतं.मात्र 13 जून रोजी अजित पवारांनी शरद पवार गटाला एकही जागा न देता श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली त्यामुळे आपसूकच शरद पवार गटाला बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं लागलं. मात्र शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. दुसरीकडे कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात कष्टकरी शेतकरी पॅनलने ही आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत.

मतदान झालं आता केवळ फक्त मतमोजणी बाकी...

मतदान झालं आता केवळ फक्त मतमोजणी बाकी आहे, यामध्ये अजित पवारांच पॅनल विजयी झालं तर बारामतीच्या राजकारणातून शरद पवारांची पकड सैल होत चालली की काय असा प्रश्न उपस्थित होईल आणि जर गालबोट लागलं तर अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो.

रविवारी 22 जून रोजी माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली या तब्बल 88 टक्के मतदान झाले. आता या मतदानाची मोजणी पार पाडणार आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तावरे गटाचे नेते सहकार महर्षी चंद्रराव तावरे चेअरमन पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ टाकणार हे पाहणं महत्वाचं असेल.

माळेगाव चा चेअरमन कोण उत्सुकता शिगेला...

माळेगाव कारखान्याची निवडणूक ही पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. काल यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनल रिंगणात होते. त्यामुळे बारामतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उमेदवार आहेत. त्यामुळे विविध गटांमधील चुरस शिगेला पोहोचली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्याच्या मतमोजणीच्या निकालाकडे लागले आहे.

माळेगाव कारखान्यासाठी ८८ टक्के मतदान झालंय, विशेष म्हणजे बारामती, पणदरे, सांगवी, नीरावागज आणि माळेगाव या गटांत विक्रमी मतदान झालेय. अ वर्गासाठी १९ हजार ५४९ मतदारांपैकी १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यात १२ हजार ८६२ पुरुष तर चार हजार ४३४ महिलांचा समावेश आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार असलेले 'ब' वर्ग सभासद संस्था मतदारसंघात १०२ मतदार आहेत. त्यातील १०१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या मतमोजणी पार पडेल आणि यानंतर माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी ठरवले जातील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow