बिग ब्रेकिंग | भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर ! अशी आहे यावर्षीची स्थिती

May 1, 2025 - 08:43
 0  293
बिग ब्रेकिंग | भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर ! अशी आहे यावर्षीची स्थिती

आय मिरर

शेतकरी बांधवांसोबतच सर्वांना दरवर्षी बुलडाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची प्रतिक्षा असते. अखेर भेंडवळची भविष्यवाणी आज गुरुवारी पहाटे जाहीर करण्यात आली आहे. साधारणपणे देशात चालू वर्षी परिस्थिती कशी असेल या आधारावर हे भाकीत वर्तवण्यात येते. काल बुधवारी घट मांडणी झाली होती, त्यानुसार आज भाकीत वर्तवण्यात आले आहे. 

भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून, पावसाळ्याचा पहिल्या महिन्यात कमी  पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या महिन्यात त्यापेक्षा थोडं जास्त पावसाची शक्यता आहे, तिसऱ्या महिन्यात भरपूर पाऊस तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस असेल असे भाकित पावसासबंधी वर्तवण्यात आले आहे. 

दरम्यान यंदा अवकाळी पवासाची शक्यता देखील अधिक असल्याचे या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे. यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, पिकाच्या नासा़डीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे. धोकादाय बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे.

३५० वर्षाची परंपरा असल्याचा दावा....

शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. पुरातन नीलवती विद्येचे जाणकार असलेले चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. परंपरागत ज्ञान, निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भाकिते वर्तवली. सोबतच पशुपक्ष्यांचे निसर्गासंदर्भातील संकेत अभ्यासून त्यांनी भाकिते वर्तवली होती. त्यांच्या पिढीअंतर्गतच सध्या ही परंपरा आहे. 

रामदास महाराज वाघ यांचे निधन झाल्यानंतर सध्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज काही वर्षापासून भाकिते वर्तवत आहेत. त्यांची ही अकरावी पिढी आहे. काल अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयी नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात मांडलेल्या या घटमांडणीतून नैसर्गिकरीत्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकीत वर्तवले. ही ‘भविष्यवाणी’ ऐकण्यासाठी विदर्भ आणि खान्देश पट्ट्यातील सीमावर्ती भागातील जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित होते. बुलडाणा, जळगाव खान्देश व मध्य प्रदेशलगतच्या आदिवासी पट्ट्यातील शेतकरी वर्गाची भेंडवळच्या या घटमांडणीच्या भाकीतावर मोठी श्रद्धा असून या भाकीताच्या आधारेच ते खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करतात.

तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस...

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते आज जाहीर करण्यात आले. सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.. यंदा महत्त्वाचा मानल्या जाणारा पिक पावसाची परिस्थिती मध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यातही पाऊस जास्त असेल मात्र या महिन्यात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.पिका बाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पीक सांगण्यात आली आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आल आहे.

तर या वेळेस महायुद्ध होईल...

राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेला आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार असं भाकीच वर्तवण्यात आल आहे.मात्र परकीयांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे. याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी असून युद्ध झाल्यास तर या वेळेस महायुद्ध होईल. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow