मंत्री अदिती तटकरे यांची बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयास भेट ! उपस्थित महिलांशी साधला संवाद

Jul 20, 2024 - 17:01
 0  71
मंत्री अदिती तटकरे यांची  बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयास भेट ! उपस्थित महिलांशी  साधला संवाद

आय मिरर

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयास भेट दिली आहे. यावेळी आदिती तटकरे यांनी उपस्थित महिला अंगणवाडी कास अंगणवाडी सेविका यांच्याशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात संवाद साधला.

स्वतंत्र अकाउंट असणं गरजेचं...

प्रत्येक महिलेचे बँकेत खातं असणं, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी बंधनकारक आहे. कारण प्रत्येक माता भगिनीचे हक्काचे पंधराशे रुपये. नवऱ्यासोबत संयुक्त खाते असेल तर ते पंधराशे रुपये कधी वापरले जातील. हे तुम्हाला कळणार ही नाही असं म्हणत आतापर्यंत तुमचे बँक खाते कुठे होते तर ते धान्यांच्या डब्यात, कपाटातील साडीत असायचे. त्यामुळे आता तुम्हाला पंधराशे रुपयांचा जो निधी मिळणार आहे. त्यासाठी तुमचं स्वतंत्र बँक खातं असणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow