प्रत्येक ग्रामपंचायतने दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करावं,मंत्री भरणेंकडे अनिता खरात यांची मागणी

आय मिरर
राज्य सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान गौरव पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायत मधून वितरित केला जावा अशी मागणी तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात यांनी राज्याची उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांकडे केली आहे. खरात यांनी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन देत शासनाच्या या अध्यादेशाच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पालन केलं जाव अशी मागणी केली आहे.
तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत उचित व्यक्तीला देण्यात यावा या संदर्भात एक जागर काढली आहे.
या अंतर्गत अनिता खरात या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य आणि ग्रामसेवकाला भेटून यासंदर्भातील एक निवेदन देत आहेत की संबंधित ग्रामपंचायतीने 31 मे रोजी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्तबगार दोन महिलांना शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान देऊन सन्मानित करण्यात यावं.
आतापर्यंत तालुक्यातील अंथुर्णे,गोतोंडी, कळंब,चिखली,जांब कुरवली,तावशी,अकोले,भवानीनगर,सणसर, लासुर्णे,काझड, बोरी या ग्रामपंचायतींना अनिता खरात यांनी समक्ष भेटून तेथील सरपंच ग्रामसेवक कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांना या पुरस्कारासंदर्भात निवेदन दिली आहेत. या जनजागर यात्रेला तालुक्यातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही अनिता खरात यांनी सांगितलं.
What's Your Reaction?






