अपंग कल्याण निधी तात्काळ वाटप करा,अन्यथा आंदोलन करू ! भिगवण ग्रामपंचायतीस ग्रामस्थांचा इशारा

Mar 16, 2025 - 07:44
 0  155
अपंग कल्याण निधी तात्काळ वाटप करा,अन्यथा आंदोलन करू ! भिगवण ग्रामपंचायतीस ग्रामस्थांचा इशारा

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण ग्रामपंचायत अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या अपंग/दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधी अद्याप पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही.त्यामुळे येथील काही युवकांनी ग्रामपंचायतीस (दि.१५ रोजी) निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत उत्पन्नाच्या ५% अंध,अपंग,दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वनिधीतील ५% निधी हा दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जाणे गरजेचे आहे. चालू आर्थिक वर्ष (२०२४-२५) संपत आले तरीही भिगवण ग्रा.प. ने सदरच्या निधीचा वापर केल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस निवेदन देत येत्या ८ दिवसात अपंग कल्याण निधीचे वाटप करावे,तात्काळ अपंग निधी वितरित न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.यावेळी आप्पासाहेब गायकवाड,प्रा.तुषार क्षीरसागर, ऍड.सुरज खटके,अमर धवडे, किशोर पोंदकुले,आकाश उंडाळे, कपिल लांडगे उपस्थित होते.

दरम्यान याबाबत भिगवन ग्रामपंचायत तिचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सरपंच निवड प्रक्रियेमुळे निधी वाटपासाठी विलंब झाला आहे, मार्च अखेरीस लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

तर नवीन सरपंच निवड होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून त्यामुळे विलंब होण्याचे फक्त निमित्त आहे. परंतु,सध्या ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे,निधीची कमतरता जाणवत आहे त्यामुळे देखील विलंब होत आहे असं भिगवांचे ग्राम ऍड.सुरज खटके यांनी म्हटल आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow