लाखेवाडीच्या जय भवानीगड विकास प्रतिष्ठानमध्ये योगा डे साजरा

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी कडे विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दरम्यान योग शिक्षक नितीन बांगर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात असणारी योगाची माहिती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, प्राणायाम व विविध आसनांचे प्रकार करून घेण्यात आले.
संगीत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी 'सत्यम शिवम सुंदरा' ही प्रार्थना अतिशय लयबद्ध व सुरेल आवाजात म्हटली. विद्यार्थ्यांचा ताण तणाव दूर करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन ही करण्यात आले होते.
करा योग रहा निरोग या उक्तीप्रमाणे सर्वांनी विविध प्रकारची योगासने करून आपले आरोग्य सुव्यवस्थित राखावे असे आवाहन यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे,मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी सर्वांनाच योग दिनानिमित्त आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांसह सर्व विभागाचे सुपरवायझर शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






