ते जेवण करुन झोपले ते पुन्हा उठलेचं नाहीत ; चिमुकल्या बहीण भावाच्या मृत्यूने परिसर हादरला

Apr 2, 2024 - 11:52
Apr 2, 2024 - 11:53
 0  2580
ते जेवण करुन झोपले ते पुन्हा उठलेचं नाहीत ; चिमुकल्या बहीण भावाच्या मृत्यूने परिसर हादरला

आय मिरर

अलिबागमध्ये झोपेतच दोन लहान भावंडांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. मूळच्या यवतमाळ इथल्या असणाऱ्या या लहान भावंडांच्या मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.अलिबागच्या किहीम आदिवासीवाडी इथं ही घटना घडलीय.

अवघ्या ६ वर्षांच्या आणि ३ वर्षांच्या चिमुकल्यांचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच सर्व प्रकार स्पष्ट होईल. नेमका मृत्यू कशाने झाला, घातपात असेल तर कोणी केला? याचा तपास पोलीस करत आहेत. मांडवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल सदानंद पोळे आणि सदानंद नामदेव पोळे हे आराध्या (6वर्षे) सार्थक (3वर्षे) या मुलांसह किहीम आदिवासी वाडीत राहत होते. वर्षभरापासून ते दाजीबा पटोले यांच्याकडे कामासाठी आहेत. रविवारी दुपारी जेवल्यानंतर आराध्या, सार्थक झोपले होते. पण बराच वेळ दोघेही उठले नाहीत. तेव्हा आई शीतल यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची काहीच हालचाल होत नसल्यानं थेट रुग्णालयात नेण्यात आलं.

जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री आठ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. लहान भावंडांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईत जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांकडे सोपवले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow