प्रेमविवाह करून गावात आली, एका मुलानंतर दुसऱ्याच्या प्रेमात पडली ! भयानक शेवट झाला

आय मिरर
अनैतिक संबंधांतून बऱ्याच हादरवून सोडणाऱ्या घटना घडत असल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. सातारा तालुक्यातील शिवतर तालुक्यात असंच एक प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे.
अनैतिक प्रेमसंबंधाच्या द्वेषातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गावातील विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा तालुक्यातील शिवतर गावातील एका विवाहित महिलेचे तरुणासोबत अनैतिक संबंध होते. आरोपी आणि पीडित महिलेचे गेल्या 6 वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू असल्याची माहिती समोर आली.
पूजा जाधव या तरुणीचे 2017 मध्ये प्रथमेश जाधव या तरुणाबरोब लग्न झाले होते. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रेमविवाह होता. लग्नानंतर पूजाला एक मुलगा ही झाला. याच काळात तिचे गावातल्याच अक्षय साबळे या तरुणा बरोबर सुत जुळले.दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याकारणाने प्रियकराने तिला पळून जाऊन लग्न करण्याची मागणी घातली होती. मात्र, या मागणीला प्रेयसीचा विरोध होता. तिने पळून जाऊन लग्न करण्यासाठी नकार दिला. याच रागातून आरोपी प्रियकराने तिचा खून केला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
प्रेयसीच्या घरात घुसून केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा प्रथमेश जाधव या 27 वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गुरुवारी (7 जुलै) दुपारी 12 ते 3.30 च्या सुमारास आरोपीने तिच्या घरात घुसून पुजाचा खून केला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांच्या तपासात गोपनीय माहितीवरून मयत पूजाचा प्रियकरच या खुनामागे असल्याचा खुलासा झाला.
केवळ 8 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात
त्यानंतर आरोपीच्या तपासासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुण्यातील स्वारगेटमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि तिथून त्याला अटक करण्यात आली.
सातारा तालुका पोलिसांनी सापळा रचत पुण्यातील स्वारगेट परिसरातून अवघ्या 8 तासांत हा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांचे कौतुक होत असून, फक्त आठ तासांत खून उकलल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे.
What's Your Reaction?






