Ujani Dam : उजनी 72 टक्के भरले 16 दरवाजे उघडले ! उजनीच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग,जून महिन्यातच...

Jun 21, 2025 - 07:06
Jun 21, 2025 - 07:24
 0  2787
Ujani Dam : उजनी 72 टक्के भरले 16 दरवाजे उघडले ! उजनीच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग,जून महिन्यातच...

आय मिरर

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 16 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार हा प्रवाह कमी अधिक करण्यात येऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काल शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या उजनी धरण 72 पूर्णांक 79 टक्के क्षमतेने भरले असून उजनीत एकूण 102 पूर्णांक 65 टीएमसी पाणी साठा झाला आहे.उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे.जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा होतो.

आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या 18 ते 20 लाख भाविकांना पुराचा त्रास होऊ नये यासाठी काल उजनी धरणातून पाच वाजता दहा हजार क्युसेक वीसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने पंढरपूर वर पुराची टांगती तलवार ऐन यात्रा कालावधीत राहणार होती. यावर तोडगा म्हणून आता उजनी धरणातून दहा हजार क्युसेक विसर्गा ने भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. 

उजनीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच धरण जूनमध्येच वेगाने भरू लागल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली होती. सध्या उजनी धरणात जवळपास 72.79 टक्के एवढे पाणी असून जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेपूर्वीच पंढरपूरला पुराची शक्यता होती. यामुळे आता उजनी धरणाची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून 42 हजार 637 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow