लंगड्या कोंबड्यांवरून झालेल्या वादाचा करून अंत ! मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर खूनाचा गुन्हा

Jul 8, 2025 - 10:30
Jul 8, 2025 - 11:14
 0  2711
लंगड्या कोंबड्यांवरून झालेल्या वादाचा करून अंत ! मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर खूनाचा गुन्हा

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्या भरताना झालेल्या किरकोळ वादातून एकाला मारहाण करण्यात आली होती. उपचारा दरम्यान या मारहाण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रियाज चुन्नुमिया जगिरदार हडपसर असं मयत व्यक्तीचं नाव असून इंदापूर पोलिसांनी गलांडवाडी नंबर एक येथील चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.

फिर्यादी आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील विशाल सूर्यवंशी यांच्या पोल्ट्री फार्म जवळ ही घटना घडली आहे.

त्यांचे मेव्हणे रियाज जगिरदार हे पोल्ट्री फार्मवर कोंबड्या भरत असताना, लंगड्या कोंबड्या गाडीत टाकू नका,असे सांगितल्यावर वाद निर्माण झाला. या वादातून निखील जाधव, विकी नलावडे, लहु शिंदे आणि विशाल कांबळे या चौघांनी मिळून रियाज यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बारामती आणि नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी निखील जाधव सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow