मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचा गौरव,संत तुकोबांच्या सोहळ्यात वारकऱ्यांना दिली चरण सेवा

Jul 6, 2025 - 09:42
 0  144
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचा गौरव,संत तुकोबांच्या सोहळ्यात वारकऱ्यांना दिली चरण सेवा

आय मिरर 

जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात इंदापूर तालुक्यातील सणसर ते पंढरपूर तालुक्यातील वाखरी पर्यंत 350 हून अधिक नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांना चरण सेवा दिली आहे. याबद्दल जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.संस्थेचे प्रमुख जयवंत नायकुडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

लाखो वारकरी विठ्ठलाचं नामस्मरण आणि 'ग्यानबा-तुकाराम' चा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं पायी गेले. या वारीत रोज काही किलोमीटर अंतर वारकरी चालत होते.

विठुरायाच्या दर्शनाकरीता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांकरिता राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खास चरणसेवा हा उपक्रम राबवला होता. यात हजारो वारकऱ्यांनी सेवेचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या उपक्रमात जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेज ची निवड करण्यात आली होती. इंदापूर तालुक्यातील सणसर ते पंढरपूर तालुक्यातील वाखरी या प्रवासातील प्रत्येक मुक्काम स्थळी नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी वारकऱ्यांना सेवा दिली.

कोणत्याही लाभा विना हे विद्यार्थी माऊलींची सेवा करताना पहायला मिळाले. नर्सिंग चे शिक्षण घेत असताना वारकऱ्यांच्या रूपात आम्हाला साक्षात पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य लाभल्याचे प्रतिक्रिया या नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी दिली.

तर गेले अनेक वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रम राबवत असतो. प्रत्येक वर्षी दिंडी सोहळ्यात युवा क्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थीनी सहभाग घेऊन वारकऱ्यांची सेवा करतात, कोरोना महामारीत अवघं जग वेधलं असताना आमच्या विद्यार्थीनी मैदानात सेवा देत होत्या. त्याचं फळ आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून चरणसेवा रुपी मिळालं यापेक्षा मोठा आनंद नाही अशी प्रतिक्रिया संस्थेचे प्रमुख जयवंत नायकुडे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow