धावत्या एसटीचे चाक निखळले, स्टेटस साठ प्रवासी ; वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल' धावून आला !

Jul 7, 2025 - 11:44
Jul 7, 2025 - 12:02
 0  1106
धावत्या एसटीचे चाक निखळले, स्टेटस साठ प्रवासी ; वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल' धावून आला !

आय मिरर 

पंढरपूरहून संभाजीनगरला परतत असलेल्या एसटी बसचे चाक गहिनीनाथनगर जवळील राष्ट्रीय महामार्गावर निखळले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या 'विठ्ठल रंधवे' या मोटरसायकलस्वाराच्या निदर्शनास ही बाब आल्याने मोठा अपघात टळला.

मोटरसायकलस्वाराच्या तत्परतेमुळे बसमधील ६० भाविकांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी चार वाजता घडली.

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी पंढरपूरहून देवदर्शन करून काही भाविक संभाजीनगरला बसने परतत होते. ही बस अबंड तालुक्यातील गहिनीनाथ नगर येथील महामार्गावर आली असता या बसचे एक चाक निखळले.

याच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या 'विठ्ठल' रंधवे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने बस चालकाला थांबवत बसच्या अडवी मोटरसायकल लावली. व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

त्यांच्या तत्परेमुळे बसमधील ६० भाविकांचे प्राण वाचले. त्यानंतर विठ्ठल रंधवे यांनी बस चालकाला 'बसचे टायर निखळले तरी तुमच्या लक्षात कसे आले नाही', असे म्हणत जाब विचारला.

बस चालकाने दिलगिरी व्यक्त करत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर चालकाने बस डेपोत संपर्क साधत प्रवांशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow