कॅफेत मिठी मारली, नग्न व्हिडीओ काढत ब्लॅकमेल केलं; राजकीय पंढरी असणाऱ्या बारामतीत धक्कादायक घडलं

आय मिरर
दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच बारामती तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॉलेज करणाऱ्या एका विद्यार्थिनीशी मैत्री करत तिला कॅफेमध्ये नेऊन तिचा अश्लील व्हिडिओ काढत तिला ब्लॅकमेल करण्यात आल आहे.
एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी मैत्री करत पुढे तिला कॅफेमध्ये नेत तिचा अश्लिल व्हिडिओ काढण्यात आला त्या आधारे तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात घडला असून या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनयभंगासह ॲट्रॉसिटी यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,डिसेंबर २०२४ मध्ये तक्रारदार युवतीची एका मैत्रिणीने पार्थ याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानंतर फिर्यादी व पार्थ या दोघांचे एकमेकांचे मोबाईल बोलणे होवू लागले. जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादीचा वाढदिवस होता.त्यावेळी पार्थ याने तिला पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका कॅफेमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यासोबत फोटो काढले.
त्यानंतर तक्रारदार युवती दि. १६ जानेवारी रोजी ती महाविद्यालयात असताना पार्थ याने तिला फोन करून “तु मला खुप आवडतेस’ “माझे तुझेवर खुप प्रेम आहे असे म्हणत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मात्र फिर्यादीने पार्थ ला नकार दिला. पार्थ ने पुन्हा वेळोवेळी तिच्याकडे तु माझेशी रिलेशन ठेव असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली.
त्यानंतर करंजेपूल येथील एका कॅफेमध्ये भेटल्यावर तिच्या नकळत तिचा व्हिडिओ काढला गेला. तिला मिठी मारून तिचा विनयभंग कऱण्यात आला.त्यानंतर हा व्हिडिओ तक्रारदारी युवतीच्या घरच्यांना पाठवण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले गेले. पार्थ व रोहन या दोघांनी तिचा घराच्या गेटपर्यंत तिचा पाठलाग केला.
पुढे पार्थ याने तिला ब्लॅकमेल करत व्हाटसअपवर व्हिडिओ काॅल केला. तिला सर्व कपडे काढण्यास भाग पाडत मोबाईलवर स्क्रिन रेकाॅर्डींगद्वारे तिचे नग्न व्हिडिओ तयार केले गेले. तु जर रिलेशन ठेवले नाही तर हे व्हिडिओ तुझ्या नातेवाईकांना पाठवेन अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिला मानसिक त्रास दिला गेला.
पार्थ शिंदे याने अनोळखी पाच मोबाईल क्रमांकावर फिर्यादीच्या नातेवाईकांना तिच्याबद्दल उलटसुलट सांगत तिच्यासोबत काढलेले फोटो तसेच ती अन्य एका मुलासोबत कॅफेमध्ये बसली असताना नकळत काढलेले फोटो, तसेच त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो व नग्न व्हिडिओ ही नातेवाईकांना पाठवले. यासोबत हनुमंत शिंदे याने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या बहिणीला हे फोटो व नग्न व्हिडिओ पाठवण्यात आले.
दिनांक २९ जून रोजी पार्थ, रोहन, सूरज, हनुमंत, विजय व तुषार या सर्वांनी फिर्यादी मुलीची बहीण बहिण यासोबत तिचे नातेवाईक यांना फोटो, व्हिडिओ पाठवले.पार्थ ने पीडित मुलीच्या बहिणीला फोन केला आणि या मुलीने मला फसवले आहे, ती माझ्याशी दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असताना आणखी चार-पाच मुलांसोबत रिलेशन ठेवले असल्याचं सांगितलं.तर रोहन याने देखील आपल्याला फोन करून शिविगाळ दमदाटी केली असल्याचे तक्रारीत फिर्यादीने म्हटलं आहे.
What's Your Reaction?






