संशयास्पद हालचाली करताना दिसले, पोलिसांनी झडती घेतली तर 22 किलो गांजा सापडला ! दोघांना अटक

Jul 8, 2025 - 18:56
Jul 8, 2025 - 19:01
 0  378
संशयास्पद हालचाली करताना दिसले, पोलिसांनी झडती घेतली तर 22 किलो गांजा सापडला ! दोघांना अटक

आय मिरर 

आंबेगाव शहरात गांजाची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो गांजा, मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे चार लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अक्षय अंकुश माने (वय ३०, रा. घोरपडे पेठ) आणि यश राजेश चिवे (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक-एकमधील पोलिस गस्तीवर असताना आंबेगाव बुद्रुकमधील शनीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांच्याकडे एक मोठे नायलॉनचे पोते होते. पोलिसांनी पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये २२ किलो गांजा आढळून आला.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow