भिगवण जवळील बिल्ट ग्राफिक्स् समोर मराठा महासंघ करणार ठिया आंदोलन ; वाचा काय आहे कारण 

Nov 3, 2023 - 11:19
 0  436
भिगवण जवळील बिल्ट ग्राफिक्स् समोर मराठा महासंघ करणार ठिया आंदोलन ; वाचा काय आहे कारण 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

अखिल भारतीय मराठा महासंघाने बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी लिमिटेड भादलवाडी व प्रशासन यांना माथाडी कामगार कंत्राटी कामगार आणि स्थानिक कामगार तसेच इतर मागण्यांसाठी सप्टेंबर 2023 रोजी लेखी निवेदन देऊन पंधरा दिवसांमध्ये संघटनेच्या मागण्याची पूर्तता करुन कामगारांना न्याय देण्याची मागणी केलेली होती. त्यानंतरही संघटनेच्या मागण्याचा विचार न केल्यामुळे संघटनेने पुन्हा स्मरणपत्र दिलेले होते त्यानंतर मागण्या मान्य न झाल्याने आता बिल्ट ग्राफिक्स् समोर मराठा महासंघ करणार ठिया आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांनी दिली. 

जगताप म्हणाले की, स्मरणपत्र दिल्यानंतर तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांनी त्यांच्या दालनामध्ये कंपनी प्रतिनिधी माथाडी कामगार बोर्ड प्रतिनिधी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व संघटना प्रतिनिधी यांचे समक्ष बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला होता. दि. 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ कार्यालयात बैठक घेण्याचे ठरलेले होते परंतु त्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली गेलेली नसल्यामुळे संघटनेने दि. 30 आँक्टोंबर 2023 रोजी कंपनी तसेच प्रशासनाला लेखी निवेदन दिलेले आहे.की पाच नोव्हेंबर 2023 रोजी बिल्ट कंपनीच्या मुख्य गेटच्या समोर मराठा महासंघ तसेच सर्व सामाजिक राजकीय संघटनांसोबत हे आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनामध्ये भिगवण परिसरातील अनेक ग्रामपंचायती तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याचे मराठा महासंघाला लेखी कळविलेले आहे. सदर आंदोलन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. 

सदर आंदोलनाला संबोधित करण्यासाठी युवक राष्ट्रीय अध्यक्ष आतिश गायकवाड, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी किशोर गिराम पाटील, विभागीय संघटक राजकुमार मस्कर सर ,पुणे जिल्हा उत्तर विभागाचे अध्यक्ष व माथाडी प्रश्नाचे जाणकार अंकुश लांडे ,जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार, युवक अध्यक्ष तुषार चव्हाण, भिगवन शाखाध्यक्ष छगन वाळके, भिगवण शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, माथाडी प्रतिनिधी दशरथ बंडगर यांच्यासह हजारो नागरिक तसेच विविध सामाजिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

काय संघटनेच्या मागण्या - १. मा.सहाय्यक कामगार आयुक्त सो पुणे यांनी दिनांक 11À 11À2011 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिशिष्ट ब मधील प्रतीक्षा यादीतील कामगार यांना माथाडी बोर्डामध्ये नोंदित करून घेऊन त्यांना माथाडी म्हणून कामावर घेणेत यावे.

२. सदर दिनांक 11À11À2011 चा आदेश मान्य नसल्यास तो रद्द करून मूळ 36 माथाडी कामगार ठेवण्यात यावे

३. माथाडी बोर्डाने दिनांक 11À11À 2011 चा आदेश डावलून त्यानंतर आजपर्यंत केलेल्या नोंदीत कामगारांच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा

४. सदर माथाडी बोर्डातील अनागोंदी कारभार करणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी.

५. बिल्ट कंपनीमध्ये सक्षम माथाडी निरीक्षक यांच्याकडून व संघटना प्रतिनिधी यांच्या समक्ष अचानकपणे कंपनीतील वेगवेगळ्या निवेदनात सांगितले ठिकाणची तपासणी करून माथाडी स्वरूपाचे कामाची पाहणी करून तेथे माथाडी कामगारांची नोंदणी करून भरती करण्यात यावी

६. कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे कामगार यांना कायम कामगार म्हणून नियुक्ती करण्यात यावे

७. सदर कंत्राटी कामगार यांचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे कायद्याची पायमल्ली करीत आहेत त्यांना संघटनेने मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यास कंपनी प्रशासन यांनी सांगण्यात यावे

८. बिल्ट कंपनीकडून अनेक कायद्याची पायमल्ली होत असून मर्जीतील लोकांमार्फत कायम कामगार केले जातात त्याची चौकशी व्हावी

९. बिल्ट कंपनी शेजारील अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यावर कायमस्वरूपी ची उपाययोजना करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी

१०. सदर बिल्ट कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामगार म्हणून प्राधान्याने भरती करण्यात यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow