इंदापूर गोळीबार प्रकरण : मैत्रिणीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार अविनाश बाळू धनवे याची पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून तीन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यातील एका आरोपीला पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीन ने ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल संदीप चव्हाण असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. तेव्हा त्याला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी पकडले.
शनिवारी 16 मार्च रोजी हॉटेलवर जेवायला थांबलेल्या अविनाश धनवेवर गोळीबार केला गेला. कोयत्याने वार करीत त्याला संपवलं गेलं. संपूर्ण राज्याचे लक्ष या घटनेने वेधलं. मात्र घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांच्या पथकाने या हत्याकांडातील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
शिवाजी बाबुराव भेंडेकर, (वय ३५ वर्षे, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे),मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २० वर्षे, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४, चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते, (वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत.
त्यानंतर आता राहुल संदीप चव्हाण ला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी पकडले आहे.तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले.
What's Your Reaction?






