बायकोचं प्रेम नवऱ्याचा गेम - सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा

Dec 25, 2024 - 21:50
Dec 25, 2024 - 22:03
 0  57
बायकोचं प्रेम नवऱ्याचा गेम - सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा

आय मिरर

पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सतीश वाघ यांची हत्या करणारा शेजारची व्यक्ती असल्याची आधी चर्चा होती. पण आता पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्या घरातील त्यांच्या चिरसंगिनी असलेल्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर येत आहे. पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्याच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रकरण होतं. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय. 

सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जाणून घेऊयात...

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अक्षय जवळकर याला सुपारी देण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

  1. मोहिनी वाघ
  2. पवनकुमार शर्मा
  3. विकास शिंदे
  4. अतिश जाधव - धाराशिव
  5. अक्षय जवळकर - सुपारी देण्यात आलेला व्यक्ती. 

संपूर्ण प्रकरण काय आहे?

भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow