एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला,पण ललित म्हणतो मी पळालो नाही मला पळवलं गेलं
आय मिरर
ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला शोधण्यासाठी जंग - जंग पछाडत होते. पण कोणतीची माहिती मिळत नव्हती. मात्र ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला.
साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.
ललित पाटीलने म्हटलं की, 'मी पत्रकारांशी बोलेन,मी ससूनमधून पळालो नाही.मला ससून रुग्णालयातून पळवलं गेलं', असा गौप्यस्फोट ललिल पाटीलने केला आहे.यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, हे लवकरच सांगेन', असंही ललित पाटीलने म्हटलं आहे.यामुळे या प्रकरणात आता आणखी काय समोर येत हे पाहावं लागणार आहे.
२ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता ललित पाटील - ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. पण अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.
ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. तर, ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला अखेर पोलिसांनी तमिळनाडूतील चेन्नई येथून अटक केली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?