धक्कादायक ! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा बुडून मृत्यू तर दोघींना वाचवण्यात यश

Apr 2, 2024 - 17:50
 0  1291
धक्कादायक ! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा बुडून मृत्यू तर दोघींना वाचवण्यात यश

आय मिरर

सातवीमध्ये शिकणाऱ्या पाच मैत्रिणी सोमवारी एकत्र जलाशयामध्ये पोहण्यासाठी गेल्या असता, दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलींना वाचविण्यात यश आले. महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे सोमवारी 1 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलींच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनाक्षी तानाजी कदम (वय 12), सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय 12) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर सृष्टी सुनील नलावडे (वय 13) ही जखमी असून, तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळणे गावातील आशासेविका शुभांगी सुनील तांबे (वय 43) यांची मुलगी हर्षदा तांबे सातवीमध्ये शिकते. सातवीचा अभ्यास करण्यासाठी तिच्या मैत्रिणी रोज त्यांच्या घरी येतात. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी हर्षदा सुनील तांबे, आर्या दीपक नलावडे, सृष्टी सुनील नलावडे, सोनाक्षी तानाजी कदम व सोनाक्षी रामचंद्र सुतार या पाच मुली घरात अभ्यास करीत होत्या. दुपारी सर्व मैत्रिणी जलाशयावर पोहण्यासाठी गेल्या. खोलीतून मुलींचा आवाज येत नाही म्हणून आशासेविका शुभांगी तांबे यांनी डोकावून पाहिले तेव्हा मुली दिसल्या नाहीत. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, शिवसागर जलाशयाच्या दिशेने मुलींचा आरडाओरडा सुरू होता. शुभांगी तांबे तातडीने जलाशयावर गेल्या असता, चार मुली पाण्यात बुडत होत्या. तर त्यांची मुलगी हर्षदा आरडाओरडा करीत होती. यावेळी शुभांगी तांबे आणि मच्छिमार मुलांनी आर्या नलावडे आणि सृष्टी नलावडे यांना वाचविले. तर सोनाक्षी सुतार व सोनाक्षी कदम या दोघींचा बुडून मृत्यू झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow