आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द,संजय गायकवाडांच्या मारहानीनंतर FDA ची कारवाई

Jul 10, 2025 - 19:05
Jul 10, 2025 - 19:05
 0  454
आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द,संजय गायकवाडांच्या मारहानीनंतर FDA ची कारवाई

आय मिरर 

आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणात अजंता केटरर्सचा परवाना रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर अन्न आणि औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासातील कॅन्टीगमध्ये निकृष्ट जेवण देण्यात आले होते. यानंतर आमदार गायकवाड यांनी कॅन्टीगमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एक पथक कॅन्टीगमध्ये चौकशीसाठी दाखल झाला होता. या पथकाने कॅन्टीगमधील जेवणाचे काही नमुने गोळा करत संपूर्ण कॅन्टीग स्टोअर रुमची तपासणी केली होती. तर आता मोठी कारवाई करत अन्न आणि औषध प्रशासनाने अजंता केटरर्सचा परवाना रद्द केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीगमधून 8 जुलैच्या रात्री जेवण्याती ऑर्डर दिली होती. कॅन्टीग कर्मचाऱ्यांकडून आमदार गायकवाड यांच्या रुममध्ये ऑर्डरनुसार जेवण देखील पुरवण्यात आले होते.

मात्र जेवणाक देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळं होतं आणि त्यात वास येत होता असा आरोप करत आमदार गायकवाड यांनी कॅन्टीग व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याने विरोधक विरोधक आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे.

तर दुसरीकडे 8 जुलैच्या रात्री वरण भात आणि पोळीची ऑर्डर केली होती. ऑर्डर आल्यानंतर मी भातासोबत वरण मिक्स करुन पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटला वरणामध्ये चिंच असेल म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाल. यानंतर मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते असं माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow