Dound Crime नवऱ्याला मारण्यासाठी उगारलेला त्रिशूल अवधूतच्या डोक्यात घुसला,क्षणात जीव गेला ! नवरा बायकोच्या भांडणाचा धक्कादायक शेवट

Jul 11, 2025 - 07:45
Jul 11, 2025 - 12:27
 0  1298
Dound Crime नवऱ्याला मारण्यासाठी उगारलेला त्रिशूल अवधूतच्या डोक्यात घुसला,क्षणात जीव गेला ! नवरा बायकोच्या भांडणाचा धक्कादायक शेवट

आय मिरर 

नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगावमध्ये घडली आहे. अवधूत सचिन मेंगवडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती मिळत असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती-पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.

यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात. किरकोळ गोष्टीवरून त्यांचे त्यांची बायको पल्लवी सोबत भांडण सुरू झालं. त्यावेळी पल्लवीने नवरा सचिन याला मारण्यासाठी त्रिशूल उगारला.

पण तो त्रिशूल बाजूला उभ्या असलेल्या भाऊजयीच्या कडेवर असणाऱ्या 11 महिन्याच्या बाळाच्या (पुतण्याच्या) डोक्यात घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या अवधूत ला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत अवधूत चा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पल्लवी तिचा नवरा नितीन यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. कोणतीही चूक नसताना या ११ महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेत पोलिसांना वेगळाच संशय असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला आहे का? आरोपींनी रक्ताने माखलेलं त्रिशूल आणि त्या ठिकाणचे रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला आहे.यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow