त्या खूनाचं गूढ यवत पोलिसांनी उलघडवलं ! पाच जण गजाआड, हे आहे कारण....

आय मिरर
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला 27 जून रोजी एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता अखेर या खूनाचा उलघडा करण्यात यवत पोलिसांना यश आला आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून यवत पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
लखन किसनराव सलगर वय २४, रा. टाकळी ढोकी, जि. धाराशिव अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून योगेश पडळकर, राजश्री पडळकर, विकास कोरडे,शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोटे या पाच जनांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यवत पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला २७ जून रोजी सकाळी एका इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
या मृतदेहावर धारदार हत्याराने हल्ला करून मृताला जिवे मारल्यावर त्याच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तांत्रिक विश्लेषण आणि मिसिंग व्यक्तींच्या नोंदींच्या तपासणीतून या मृतदेहाची ओळख पटवण्यात यवत पोलिसांच्या पथकाला यश आलं.
लखन किसनराव सलगर वय २४, रा. टाकळी ढोकी, जि. धाराशिव अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून योगेश पडळकर, राजश्री पडळकर (रा. माळशिरस, तालुका पुरंदर), विकास कोरडे (राहणार आनंदवाडी टाकळी ढोकी जिल्हा धाराशिव), शुभम वाघमोडे (राहणार मुरुड लातूर) आणि काकासाहेब मोटे (राहणार येवती जिल्हा धाराशिव) या पाच जणांनी संगनमताने खून केल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सपोनि महेश माने करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड,सहा. पो. फौजदार सचिन घाडगे, पो. हवा. मोमीन शेख, पो. हवा. अजित भुजबळ,पो.हवा.अजय घुले, पो.कॉ.धिरज जाधव, पो. हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापरे, पो. हवा, दत्ता काळे, पो. हवा. महेंद्र चांदणे, पो. हवा. रामदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हवा. गणेश कर्चे, पो. हवा. सुनिल नगरे, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हवा, परशुराम म्हस्के, पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हवा, वैभव भापकर, पो. कॉ. मारूती बागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक वेताळ, पो. कॉ. प्रणव ननवरे, पो. कॉ.प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे,पो. कॉ. सचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवसे, म.पो.कॉ. स्वप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.
What's Your Reaction?






