बिग ब्रेकिंग | संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

Jul 12, 2025 - 21:25
 0  244
बिग ब्रेकिंग | संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

आय मिरर 

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवारी दि.१२ रोजी आपल्या पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

असं असलं तरी माजी आमदार संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून मागील आठवडाभरात त्यांनी गावोगावी कार्यकर्त्यांशी संवाद साधत या संदर्भात चर्चा केली आहे याशिवाय 14 जुलै रोजी सासवड मध्ये संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असून यामध्ये संजय जगताप यांच्या भाजपप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे पाठवला असून, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे.

या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. संजय जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow