CRIME NEWS प्रेयसीचं अफेअर रंगेहात पकडलं, एकाच वेळी केल्या दोन हत्या

Jul 10, 2025 - 18:37
Jul 10, 2025 - 18:38
 0  720
CRIME NEWS प्रेयसीचं अफेअर रंगेहात पकडलं, एकाच वेळी केल्या दोन हत्या

आय मिरर 

प्रेम भंग झालेल्या एका तरुणाने दुहेरी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी या आरोपीला आता ताब्यात घेतलं आहे. प्रियसीचं आपल्याचं मित्रासोबत अफेयर असल्याने तरुणाने प्रियसी सोबतच मित्राच्या लहान मुलीची देखील हत्या केली आहे.

प्रकरण काय ?

दिल्लीतील टीला परिसरात ही घटना घडली आहे. प्रेयसीचं मित्रासोबत अफेअर सुरू असल्याचा संशय घेत त्याने प्रेयसीचा गळा चिरला नंतर मित्राच्या लहान मुलीला देखील जीवे मारून टाकलं.

या आरोपीचं नाव निखील असं आहे. तर सोनल असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नाव आहे. आरोपी निखील आणि सोनल हे मागील काही वर्षांपासून दिल्लीत एकत्र राहत होते. मात्र, थोड्या दिवसांनंतर सोनलची निखीलच्या मित्रासोबत म्हणेजच दुर्गेशशी जवळीक वाढल्याचं निखीलच्या लक्षात आल. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.

दोघांनी नातं देखील संपवलं होत. मात्र, घटनेच्या दिवशी निखील सोनालीला शोधण्यासाठी दुर्गेशच्या घरी गेला. यावेळी दोघंही घरी आढळले. याच रागात त्याने सर्जिकल ब्लेडने सोनलचा गळा चिरून तिची हत्या केली. एवढंच नाही तर दुर्गेशच्या लहान मुलीचा देखील गळा चिरून तो घटनास्थळावरून पळून गेला. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याआधीच त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow