आ.भरणेंच्या प्रयत्नांना यश ! अल्पसंख्याक समाजासाठी मंजूर झाले ३ कोटी 

Feb 29, 2024 - 12:44
 0  464
आ.भरणेंच्या प्रयत्नांना यश ! अल्पसंख्याक समाजासाठी मंजूर झाले ३ कोटी 

आय मिरर(देवा राखुंडे)

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मिळालेल्या संधीचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करायचा हे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कौशल्यातून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.शासनाचा कुठलाही विभाग असो,पण त्यातील क्रमांक एकचा निधी इंदापूरसाठी मंजूर करून आणण्यात आमदार भरणे हे नेहमीच यशस्वी झाले आहेत.त्यामुळेच आज इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला असुन आज पुन्हा एकदा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत इंदापूरसाठी सुमारे ३ कोटी निधी मंजूर झाला आहे.

गेल्याच आठवड्यात श्री.भरणे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी निधी मंजूर करण्याचे सुतोवाच केले होते.आणि लागलीच हा शब्द खरा ठरवत आमदार भरणे यांनी इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांना भरघोस निधी दिला आहे.त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आमदार म्हणून काम करताना सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाला उचित न्याय देण्यासाठी मी इमाने-इतबारे मेहनत घेतली असुन तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी-वस्तीपर्यंत विकासगंगा पोहचवली आहेच.परंतु या सोबतच खास करून दलित तसेच मुस्लिम वस्त्यांना सुध्दा भरभरून निधी देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे केला आहे.मात्र आपण एवढ्यावर समाधानी नसुन येणाऱ्या काळात अजून यापेक्षा जास्त निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

मंजूर झालेली विकासकामे व कंसात निधी :-

मौजे न्हावी येथे कब्रस्तान कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसवणे (१० लक्ष),मौजे बिजवडी पठाण मज्जिद, पठाण वस्ती येथे सभामंडप बांधणे(१० लक्ष),मौजे कालठण कब्रस्तान येथे अंतर्गत रस्ता व वॉलंपाऊंड बांधणे(१० लक्ष),मौजे सणसर येथे दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे (१० लक्ष),मौजे अंथुर्णे येथे मशिदी समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे बोरी येथे दफनभूमी इदगाह मैदान करणे (१० लक्ष),मौजे जंक्शन येथे इदगाह मैदान करणे (१० लक्ष),मौजे बोरी येथे शादीखाना हॉल बांधणे (१० लक्ष),मौजे लाकडी येथे मशीद समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे शेळगाव शेख वस्ती येथे मशिद समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे निमगाव केतकी येथे इदगाह मैदान करणे (१० लक्ष),मौजे भिगवण येथे दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे (१० लक्ष),मौजे जाचक वस्ती,शेख वस्ती येथे मज्जित समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे भांडगाव येथे दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे(१० लक्ष),मौजे निमसाखर,शेख वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे डाळज नं २ येथे मज्जिद समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष),मौजे शिरसटवाडी,पठाण वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप बांधणे(१० लक्ष),मौजे सणसर येथे इदगाह मैदान बांधणे (१० लक्ष),मौजे कळंब,पठाण वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप बांधणे (१० लक्ष), मौजे पोंदकुलवाडी येथे शादीखाना सुशोभीकरण करणे (१० लक्ष),मौजे काटी येथे शुशोभिकरण करणे(१० लक्ष),मौजे कळंब येथे कब्रस्तान वाल कंपाऊंड बांधणे(१० लक्ष),मौजे निंबोडी येथे शुशोभीकरण करणे (१० लक्ष)

 इंदापूर शहरातील मंजूर झालेली विकासकामे :-

मदिन मज्जिद येथे पेव्हर ब्लॉक व कॉंक्रिटीकरण करणे (१० लक्ष), शेख मोहल्ला मज्जिद येथे सुशोभीकरण करणे(१० लक्ष),श्रीराम कॉलनी जवळील दफनभूमीमध्ये ईदगाह मैदान तयार करणे (१० लक्ष),दर्गा मज्जिद समोर शुशोभिकरण करणे (१० लक्ष),दर्गा मज्जिद शेजारी दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे (१० लक्ष),जामा मज्जिद येथे वॉल कंपाऊंड व शेड बांधणे (१० लक्ष), मदिना मज्जिद समोर सुशोभिकरण करणे (१० लक्ष)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow