हर्षवर्धन पाटील अँक्शन मुडवर, जनता दरबारातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर मात्र निशाणा आ.भरणेंवर
आय मिरर
भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथील रत्नाई निवासस्थानी बुधावारी दि.18 जुलै रोजी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आत्तापासूनच तयारीला लागले असून उद्याची निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढताहेत की काय ? अशा चर्चा देखील मागील महिनाभरापासून आहेत.याच पार्श्वभूमीवर हा जनता दरबार महत्त्वाचा मानला जात आहे.
हर्षवर्धन पाटलांनी बावड्यात घेतलेल्या जनता दरबाराला त्यांच्या कार्यकर्त्यांनीसह सामान्य नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.आपले असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यातील मतदारांनी हर्षवर्धन पाटलांपुढे समस्यांचा पाढा वाचला, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील ही ॲक्शन मुडवर असल्याचं पाहायला मिळालं. हर्षवर्धन पाटील यांनी मागेपुढे न पाहता थेट संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावूनच नागरिकांच्या अडचणींचा त्याच ठिकाणी निपटाराही केला.यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांवरती निशाणा साधला आहे.
तालुक्यातील नागरिकांचे सामान्य प्रश्न आहेत मात्र हे प्रश्न प्रशासनाकडून सुटले जात नाहीत.प्रशासनावरती वचप राहिलेले नाही, त्यामुळे हे सर्व नागरिक आज आमच्याकडे येतात अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पण सर्वच अधिकारी काम करत नाहीत असं मी म्हणणार नाही पण एक उत्तम प्रशासन ज्याला म्हणतो ते प्रशासन गेल्या दहा वर्षात इंदापूर तालुक्यात राहिले नाही असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. कोट्यावधी रुपयाचा निधी खर्चून इंदापूरला उपजिल्हा रुग्णालय उभा केला आहे पण त्या ठिकाणी सर्पदंश झालेली औषध देखील उपलब्ध नसतात, याची जबाबदारी कोणाची आहे? तालुक्यातील या प्रश्नांकडे कोण पाहणार ? सामान्य नागरिकांचे रस्त्याचे प्रश्न सुटले जात नाहीत चार चार वर्ष त्यावरती निकाल होत नाही या प्रश्नांकडे पाहणं कोणाची जबाबदारी आहे ? असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी थेट नाव न घेता आमदार भरणे यांच्या यांवर निशाणा साधला.
सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर शहरातील मोक्याच्या जागी विमान चिन्ह असलेले अपक्षाचे बॅनर झळकले. महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरच्या जागेवर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार ते भाजपच्या वाट्याला जाणार याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता आहे. पुन्हा एकदा अजित पवार इंदापूरच्या जागेबाबत आडून बसतील आणि इंदापूरची जागा पुन्हा महायुतीच्या वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल ही सावध भूमिका ओळखतच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच अपक्षाची तयारी सुरू केली आहे.
2014 आणि 2019 ला राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांकडून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आणि या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत सध्या हर्षवर्धन पाटील आहेत. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जात असताना हर्षवर्धन पाटील यांनी यावरती मौन बाळगलेय. आपण भाजप कडून लढणार की अपक्ष लढणार याबद्दल अद्याप पर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं वागणं बरंच काही सांगून जातंय.
मागील चार दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या आजच्या जनता दरबाराबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात वायरल करण्यात आली. ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर कार्यालयाकडूनच व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र निराभिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी ही पोस्ट व्हायरल केली होती. मात्र या पोस्टवरती हर्षवर्धन पाटील यांचा फोटो वगळता अन्य एकाही नेत्याचा फोटो नव्हता. विशेष बाब म्हणजे भाजपच कमळ देखील या पोस्टवरून गायब होत. त्यामुळे तालुक्यात चर्चांना उधाण आलं असताना आणि हर्षवर्धन पाटील यांच्या अपक्षाच्या तयारीच्या चर्चा होत असताना त्यांच्याच कार्यालयाकडून अशा पद्धतीने करण्यात आलेली पोस्ट या चर्चांना खत पाणी देऊन गेली.
तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यात विविध गावांमध्ये इंदापूर तालुका विकास आघाडी असा उल्लेख असलेले शेकडो बॅनर झळकलेत. 1999 आणि 2004 ला हर्षवर्धन पाटील यांनी विमान चिन्हावर इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती आणि या दोन्ही निवडणुका हर्षवर्धन पाटील यांनी जिंकल्या होत्या. 2014 च्या पराभवानंतर 2019 ला हर्षवर्धन पाटील यांनी प्रथमच भाजपच्या कमळ चिन्हावरती विधानसभेची निवडणूक लढवली मात्र अल्प मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. आणि या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी आता विमानाशिवाय पर्याय नाही याची चाहूल कार्यकर्त्यांना लागली असल्याने उद्याची विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी विमानाच्या चिन्हावर अपक्ष लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
2014 ला दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.2019 ला ही दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. मात्र 2014 च्या आणि 2019 च्या मताधिक्यात मोठा फरक दिसला.हजारो कोटींची विकास कामे करूनही आमदार दत्तात्रय भरणे यांना 2019 च्या निवडणुकीत तितकं मताधिक्य मिळवता आलं नाही. उद्या जर हर्षवर्धन पाटील अपक्ष मैदानात उतरले तर आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
What's Your Reaction?