आ.भरणेंनी सांगितलं,अतुल तु लयं भारी कामं केलयं त्यामुळे त्या समितीचा अध्यक्ष पुन्हा तुच ! मंचावरचं दिला कार्यकर्त्याला न्याय

Jan 16, 2024 - 07:24
Jan 16, 2024 - 07:39
 0  1533
आ.भरणेंनी सांगितलं,अतुल तु लयं भारी कामं केलयं त्यामुळे त्या समितीचा अध्यक्ष पुन्हा तुच ! मंचावरचं दिला कार्यकर्त्याला न्याय

आय मिरर(देवा राखुंडे)

महावितरण चे अध्यक्षपद हे आमदाराकडे असते परंतु ते पद मी अतुल झगडे यांच्याकडे दिले होते. कारण तो फिरतो झगडतो सर्वांना घेऊन काम करतो.त्याच्या प्रयत्नामुळेच झगडेवाडी येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण झाले.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायमचा मिटला. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला लागणाऱ्या विजेचा प्रश्न संपला असून भविष्यात देखील या महत्वाच्या असणा-या समितीचे तालुकाध्यक्ष पद अतुल झगडे यांकडेचं राहिल म्हणत आमदार भरणेंनी तन-मन-धन देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मंचावरच न्याय दिला आहे.

शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथील 33/11 केविक क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले,यावेळी जाहीर सभेला संबोधन करताना दत्तात्रय भरणे बोलत होते.

भरणे म्हणाले की, झगडेवाडी या सह परिसरातील गावांचा गेले अनेक दिवस विजेचा प्रश्न गंभीर होता. या भागातील शेतकरी हा प्रचंड हुशार आहे .प्रति एकरी सर्वाधिक उत्पादन घेण्यात त्याचा हातोटी आहे. मात्र पुरशी विज उपलब्ध नसल्याने त्याला अडचणी होत्या. आता मात्र 3 कोटी 15 लाख रुपये खर्चून या ठिकाणी विजेचे उपकेंद्र निर्माण झाल्याने या ठिकाणचा प्रश्न मार्गी लागला असून या भागातील रस्ते देखील मार्गी लागले आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी या भागातील विकासकामांसाठी आपल्या प्रयत्नातून मंजुर करण्यात आला. वास्तविक पाहता 2019 च्या विधानसभेला झगडेवाडीसह या भागाने मला अधिकचं मताधिक्य दिलं नाही. मी मात्र तुम्हाला भरभरुन दिले आहे. त्यामुळे जी माणसं मदत करत असतात त्यांनी केलेल्या मदतीला जागायचे असते,उद्याच्या 2024 च्या विधानसभेत झालेली चूक तुम्ही सुधारुण घ्याल अशी अशी अपेक्षा यावेळी भरणे यांनी व्यक्त करीत भविण्यात ही आपण झगडेवाडीसह तालुक्यातील महत्वाचे असणारे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.

बावीस गावचा प्रश्न मार्गी लावणार…

बावीस गावाचा प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी .बावीस गावातील शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत त्या मी जाणतो. कारण त्या 22 गावातील शेतकऱ्यांपैकी मी देखील एक आहे. शेतकऱ्याच्या हातात जर उत्पन्न नाही आलं तर तो घर संसार प्रपंच गाडा चालू शकत नाही याची मला जाण आहे.बावीस गावचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाच टीएमसी ची योजना केली होती मात्र विरोधकांनी ती हाणून पाडली. सोलापूरकरांचा गैरसमज केला विरोधकांनी हे केलं नसतं तर आज 22 गावचा प्रश्न मार्गी लागला असता असा घनाघात ही भरणे यांनी केलं मात्र आता सध्या माझ्या डोक्यात नवा प्लॅन आहे नवीन मार्गाने मी ही योजना करणार मात्र ती कशी करणार हे कोणाला सांगणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लवकरच हा 22 गावचा प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याची ग्वाही देखील भरणे यांनी यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,प्रताप पाटील,श्रीमंत ढोले,अभिजीत तांबिले, सचिन सपकाळ,शुभम निंबाळकर, दिलीप पाटील, संदेश देवकर यांसह झगडेवाडीचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अवसरी वडापुरी रस्त्याचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडवण्यात येईल असे आश्वासन आमदार भरणे यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow