इंदापूर बस स्थानकावर दोन गट भिडले,फ्री स्टाईल मारामारी झाली ! इंदापूर पोलिसांनी दाखल केला ११ जणांविरोधात गुन्हा

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर बस स्थानकावर दोन गटांत तुफान हाणामारी झालीय. प्रवाशांसमोरच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. इंदापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप हा वाद आटोक्यात आणला.
या प्रकरणी इंदापूर पोलिसात आता 11 जणांविरोधात सामाजिक शांतता बिघडवल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 194(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वादाच नेमक कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोपान बोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,1) अजय रमेशचंद्र तिवारी वय 31 वर्षे रा. गोरेगाव वेस्ट, मुंबइ 2) वैभव ललीत गोरे वय 27 वर्षे रा. आरेकालनी गोरेगाव, मुंबइ 3) विक्की सुबोध सिंग वय 22 वर्षे रा. टाटा जमशेदपुर ता. बदलाशहर राज्या झारखंड
4) प्रिया दिपक सोळंकी वय 20 वर्षे रा. नायगाव मुंबइ इस्ट 5) रिपल रत्नाकर त्रिपाठी वय 19 वर्षे रा. कल्याण ता. कल्याण जि.ठाणे 6) प्राजक्ता दिनानाथ कहार वय 24 वर्षे रा.वसइ ता.जि. पालघर 7) पिंकी प्रेम सिंग वय 19 वर्षे रा. विरार ता.जि. पालघर8) जोहा समीर शेख वय 19 वर्षे रा. कल्याण ता. कल्याण जि.ठाणे
9) कशीश प्रकाश महाजन वय 20 वर्षे रा. कल्याण ता. कल्याण जि.ठाणे 10) आकाश हनुमंत शिंदे वय 25 वर्षे रा. बिजवडी ता. इंदापुर जि. पुणे आणि 11) आरती आकाश शिंदे वय 22 वर्षे रा. बिजवडी ता. इंदापुर जि.पुणे या 11 जणांना विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
What's Your Reaction?






