पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकलचा अपघात

May 18, 2025 - 18:38
 0  289
पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकलचा अपघात

आय मिरर 

पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल अपघातामध्ये मोटरसायकल वरील एकजन गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला नीरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमी व्यक्तीच नाव शंकर कांबळे असून तो उरुळी कांचन येथील सहिवाशी आहे.

पुणे पंढरपूर महामार्गावर पंढरपूरहून पुण्याकडे निघालेल्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस मोटरसायक व एका उभ्या असलेल्या टँकरला धडकली. यामध्ये मोटरसायकल वरील एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे.

घटनेनंतर जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला त्यांनी तातडीने उपचारासाठी नीरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow